Summary of the Book
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने "मराठी राजकीय कादंबरी' या विषयावर एक चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रातच या पुस्तकाची कल्पना पुढे आली. मराठी साहित्यातील राजकीय विषयावरच्या कादंबऱ्यांचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात अरुण साधू, शंकर सारडा, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. एकनाथ पगारे आदी मान्यवरांचे लेखन आहे.
हे पुस्तक राजकारणात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना तसेच राजकीय विषयावर लेखन करणाऱ्यांना अतिशय उपयुक्त आहे. अनेक विद्यापीठांच्या बी. ए., एम.ए. एम फिलच्या अभ्यासक्रमांत विविध राजकीय कादंबऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाच्या शेवटी "राजकारणाचे प्रतिबिंब असलेल्या कादंबऱ्या' या शीर्षकाखाली दिलेली 143 कादंबऱ्यांची यादी मोलाची आहे. डॉ. श्रीकांत तिडके आणि डॉ. शिवाजी नागरे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.