Summary of the Book
सुंदर अक्षर लिहिणे हि एक कला आहे. अक्षरांकडे बघण्याचा आणि लिहिण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. नियमित लक्ष ठेवून सराव केला तर हीच अक्षरे अधिक सुंदर दिसायला लागतात. या सुलेखन कित्त्याची मांडणीही अशाच पद्धतीने केलेली आहे. नेहमीप्रमाणे ‘क, ख, ग, घ, ङ’ असे न करता अक्षरांच्या आकाराप्रमाणे त्यांचं विभाजन करण्यात आले आहे. एका अक्षराचा सराव करता करता त्यातूनच दुसरे अक्षर तयार होईल. उदा. ‘व, ब, क’ किंवा ‘प, ष, फ’. ‘व’ चा सराव करता करता त्यातूनच ‘ब’ आणि ‘क’ निर्माण होतो. अशा पद्धतीने सगळ्या स्वरांची आणि व्यंजनांची मांडणी करण्यात अली आहे.