Summary of the Book
'कावळ्याची लेक' ह्या पुस्तकात काळ्या रंगाचा न्यूनगंड न बाळगता स्वतःचे सौंदर्य रुपात नसून गुणात आहे हेच महत्वाचे सांगणे आहे. अतिशय सोप्या सुटसूटीत आणि काव्यमय भाषेत त्याचे लिखाण आहे. चित्रकार प्रवीण राशिनकर यांनी काढलेल्या कार्टून स्टाईल चित्रांनी पुस्तक सजले असून अत्यंत विलोभनीय अश्या पक्ष्यांच्या जगाचे दर्शन घडवणारे मुलांचे विचारविश्व आणि भावविश्व वाढवणारे असे हे पुस्तक आहे.