Summary of the Book
हल्ली व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंग मेसेज किंवा 'शुभ सकाळ'चे संदेश सर्वत्र फिरत असतात. यातील काही संदेश असे असतात की लक्षात राहतात. विलास ढोकले - पाटील व प्रवीण विनायक परीतकर यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपग्रुपवर पाठविलेले असे संदेश 'ये हृदयीचे ते हृदयी'मधून वाचायला मिळतात.
ढोकले यांचे संदेश व परीतकर यांचे त्यावरील विश्लेषण असे त्याचे स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज यांचे अभंग, चित्रपटातील समर्पक गाणी यांचा आधार घेत हे सुविचार अधिक अर्थपूर्ण केले आहेत. 'ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात, तो कधीही एकटा नसतो, यात चांगल्या विचारांची देवाणघेवाण केल्यास माणूस आनंदी राहून एकटा कधीही पडत नाही, असा संदेश दिला आहे.
तसेच 'आभाळमाया'तून आईच्या मायेचे महत्व, 'पुस्तकांशी मैत्री', प्रत्यक्ष अनुभव घेण्यातून मिळणारे ज्ञान, प्रेमळ व सत्य बोलण्याने मिळणारा आनंद, खरी श्रीमंती, नीती, संस्कृती, मनाची शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, खऱ्या यशाचे मर्म अशा सुमारे शंभर सुविचारांमधून जगण्यातील आनंद, सुख, समाधान कशात आहे हे सांगितले आहे. देखण्या व साजेशा चित्रांमुळे हे संदेश अधिक वाचनीय झाले आहेत.