तो नक्की कुठून आला
9789334228885 Aarogyavishayak Arogya Arogyavishayak Health Monali Rahalkar Bahulikar Rahul Bahulikar Regarding Health To Nakki Kuthun Aala आरोग्य आरोग्यविषयक तो नक्की कुठून आला मोनाली रहाळकर बहुलीकर राहुल बहुलीकर
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 262 / $ 3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
तो नक्की कुठून आला?’ कोविडच्या उगमाचे रहस्य आणि वास्तव
कोविड -१९ ने आपल्या सगळ्यांचेच या ना त्या प्रकारे नुकसान केले. जवळचे मरण पावले, नोकऱ्या गेल्या, माणसे दुरावली. डेल्टा साथीने तर आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ माचवला. कोविडचा विषाणू नेमका आला कुठून? पुस्तकाचे लेखक डॉ. मोनाली आणि राहुल ह्या रहस्यभेदाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होते. किंबहुना भारतामधून अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी ह्यावर काम केले, त्यात मोनाली, राहुलचा क्रमांक सगळ्यात वर आहे. हे दोघेही शास्त्रज्ञ तर आहेतच
ह्या रहस्याचे इन्वेस्टीगेशन त्यांनी फार खोलात जाऊन केले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या ४ वर्षात लोकल वरून ग्लोबलला ते पोचले आहेत आणि कोविड विषाणू कुठून कसा आला ह्याबद्दलचे धागे दोरे जमा करणे, अनेक पातळ्यांवर काम करत ट्विटर किंवा सध्याच्या क्स मध्यमवरून बोलत आहेत. आज आपण पोचलो आहोत सत्याच्या खूप जवळ. पुस्तकामध्ये नुसते त्यांचे काम नाही तर जगभरामधल्या इंटेलिजन्स,समित्या ह्यांनी काय शोधले, आणि कोविडचा विषाणू प्रयोगशाळेतून आला असावा ह्याचे पुरावे ह्या पुस्तकात आहेत. गेन ऑफ फंक्शन" संशोधनामुळे जैवसुरक्षेचे प्रश्न अधिक प्रबळ होतात. या प्रयोगांची नैतिकता आणि त्यातील संभाव्य धोके पुस्तकात विवेकीपणे मांडले गेले आहेत.म्हणजेच कोविडच्या उगमाचे वास्तव देखील! नुसते आपल्या देशालाच नाही तर जगाला अत्यंत उपयुक्त अशा विषयावर त्यांनी काम करून हे विशेष पुस्तक वाचकांपर्यंत पोचवले आहे. पुस्तकाचा शेवट सकारात्मक आहे. भविष्यातील जैवसुरक्षेसाठी कठोर धोरणे आणि जागतिक सहकार्याची गरज अधोरेखित करताना महामारीमधून मिळालेल्या धड्यांवर विचारमंथन केले गेले आहे. भविष्याकडे आशावादी दृष्टीने पाहण्याची गरजही नमूद करण्यात आली आहे. 'तो नक्की कुठून आला?' हे पुस्तक केवळ माहितीपूर्ण नाही, तर वाचकाला अंतर्मुख करते. वैज्ञानिक पुरावे, अभ्यास, आणि तर्कशुद्ध चर्चांमुळे हे पुस्तक शास्त्रज्ञांसोबतच सामान्य वाचकांनाही उपयुक्त वाटते. समाजहितासाठी एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचे हे पुस्तक!
Book Review
Write a review

Dr. Monali C. Rahalkar
14/05/2025

Please read the book review published in Sakal Saptarang last week: https://www.esakal.com/saptarang/tracing-the-truth-a-virus-and-two-indian-scientists-amp17
Vidya Gupta
05 May 2025 05 30 AM

अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत हा अत्यंत अवघड आणि क्लीष्ट विषय मोनाली आणि राहुल यांनी या पुस्तकात मांडला आहे. सामान्य माणसालाही करोनाच्या व्हायरसची सुरुवात कशी झाली याची कल्पना येईल अशी इत्यंभूत माहिती त्यांनी दिली आहे. तरीही कोणतीच विधाने विना संदर्भ केलेली नाहीत. त्या दोघांच्या अतर्क्य प्रयत्नांची जाणीव हे पुस्तक वाचताना येते. हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहीलं त्यामुळे ते सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. अशीच आणखी पुस्तके लिहून शास्त्रातील अवघड विषय हे दोघे पतिपत्नी लोकांपर्यंत नेतील अशी मला खात्री आहे, म्हणूनच अभिनंदन आणि शुभेच्छा!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat