Summary of the Book
वैद्य धनंजय खासगीवाले यांनी या पुस्तकात त्यांच्या अनुभवातून नाडीची रेखाटने केली आहेत. त्यांना नाडीपरीक्षा करताना नाडीचा जो प्रवाह जाणवला, तो त्यांनी कागदावर रेखाटला आहे. नाडीशास्त्रावर असे रेखाटन करणारे हे वेगळे पुस्तक ठरावे. रेखाटने आणि त्याबरोबर त्यांनी त्यांची निरीक्षणेही नोंदवली आहेत. नाडी कशी पाहायची, त्याची स्थाने, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.