Summary of the Book
दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा असली तरी अडचणींचे डोंगर समोर उभे राहिले की इच्छा मनात राहते; पण अशोक रघुनाथ कुलकर्णी यांनी मात्र अगदी लहानपणापासून परोपकारी वृत्ती जोपासली. त्यांची व दुसऱ्यांसाठी जगण्याचा त्यांचा ध्यास याबद्दलची ओळख शेवडे यांनी 'अवलिया'मधून करून दिली आहे.
एयर इंडियात काम करताना कुलकर्णी यांनी कलाकारांचा गट तयार करून पनवेलजवळील चिखली गावात आदिवासी पाड्यात बहारदार कार्यक्रम केला. त्या वेळी आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व कर्मचारी कलाकारांना शिकोगोला नेऊन येथे कला सदर करण्याची संधी दिली. कुलकर्णी लहान असताना त्यांना प्रबोधनकार दादासाहेब ठाकरे यानाची सेवा करण्याची संधी मिळाली.
मुंबईला जाण्यासाठी प्रबोधनकारांना बोटीत बसविल्यानंतर एक छोटी चूक झाल्याचे लक्षात आले. त्यातून त्यांनी लीलया मार्ग कसा काढला यावरून कुलकर्णी यांची हरहुन्नरी समजते. असे अनेक किस्से सांगून दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या अशोक कुलकर्णी यांचे व्यक्तिचित्रण यात रंगविले आहे.