Hard Copy Price:
25% OFF R 240R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
“महाराष्ट्र हा सखोल अभ्यास नि चिंतन करून लेखन करणाऱ्या विद्वान अभ्यासकांचा प्रांत मानला जातो. महाराष्ट्र व बंगाल राज्यांना देशभरात याबाबत मान्यता आहे. ही परंपरा पुढे चालविणारयांत अध्ययनशील संशोधकांची महाराष्ट्राला गरज आहे. माझे मित्र व संशोधक श्री.बाळासाहेब सराटे या परंपरेचा पाईक ठरले आहेत व त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. त्यांचा हा ग्रंथ आरक्षणवादी तर वाचतीलच; पण आरक्षण विरोधकांनीही तो मन:पूर्वक वाचवा असे वाटण्यास प्रवृत्त करणारा आहे. या ग्रंथाची गुणवत्ता यातच लपलेली आहे. अन्वेषक दृष्टीने लिहिलेल्या या ग्रंथाचे सर्वदूर स्वागत होईल व या ग्रंथावर साधकबाधक खुली चर्चा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत-गावांत व्हावी व एक विचारमंथन व्हावे ही अपेक्षा मी व्यक्त करतो. श्री.बाळासाहेब सराटे यांनी यापुढे संशोधनपर गंभीर सामाजिक लेखन हेच आपले क्षेत्र निवडावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
डॉ. सुधीर गव्हाणे (विभाग प्रमुख, वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभाग, डॉ. बा.आं.म. विद्यापीठ, औरंगाबाद)
“मराठा आरक्षण – लढा सामाजिक न्यायाचा हा बाळासाहेब सराटे यांनी पुराव्यावर आधारित ग्रंथ साकार केला असून समाजात मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सकारात्मक जाणीवजागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच मराठा आरक्षणासंबंधी निर्णय करणाऱ्या संबंधित यंत्रणेसाठीही या ग्रंथात पुरेसे आधार संशोधक व लेखक बाळासाहेब सराटेंनी उपलब्ध करून दिले आहेत. या ग्रंथाचे स्वागत सर्व समाजात होईल असा विश्वास वाटतो.”