Home
>
Books
>
ऐतिहासिक
>
Prachin Bharatacha Sankshipt Itihas Ani Priyadarshi Ashok Bhag 1 Va 2 - प्राचीन भारताचा संक्षिप्त इतिहास आणि प्रियदर्शी अशोक भाग १ व २
प्राचीन भारताचा संक्षिप्त इतिहास आणि प्रियदर्शी अशोक भाग १ व २
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
सम्राट अशोक हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत लक्षवेधक नाव आहे. सम्राट अशोकाच्या महान कार्याचा अनेक भारतीय व अभारतीय नामवंत लेखकांनी त्यांच्या लिखाणातून गौरव केला आहे. अशोकाच्या कार्याचा आढावा घेताना मुख्यत्वे त्यांच्या शिलालेखांचा ऊहापोह केला जातो. परंतु अशोकासंबंधीचे लिखाण हे मुख्यत्वे परकीय भाषांमध्ये आहे. मराठी भाषेमध्ये सम्राट अशोकासंबंधीचे लिखाण अगदी मोजकेच आहे. या महान राजाच्या अद्वितीय कार्याची महती मराठीतून सर्वाप्रती पोहोचावी या उद्देश्यास्तव हा लेखनप्रपंच आहे. अशोकाच्या कार्याचा आढावा घेताना अशोक कालिन भारतातील राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक परिस्थिती कशी होती? याची कल्पना असायला हवी. इतिहासाचा विद्यार्थी नसलेल्या वाचकालासुद्धा अशोकाच्या मौर्यवंशाच्या राज्यव्यवस्थेचे वर्णन वाचताना, मौर्य साम्राज्याच्या राज्यव्यवस्थेची घडी अत्यंत काटेकोरपणे बसविताना अशोकाचे आजोबा, महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य व त्याचा अत्यंत बुद्धिमान महामंत्री व गुरु आर्य चाणक्य यांनी जय प्राचीन परंपरांचा व प्राचीन विधीनियमांचा विचार केला होता, त्या परंपरा व ते विधीनियम काय होते, हेही माहित असायला हवे. तसेच अशोकपूर्वकालीन प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासात घडलेल्या प्रमुख घटना व त्यामागची राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक परिस्थिती हीदेखील माहिती असायला हवी. ज्यायोगे इतिहास वाचताना, पूर्वेतिहासाचा संदर्भ लागून विषयाचे आकलन व्हावयास मदत होते, अन्यथा अर्धवट माहिती मिळुन विषय पूर्णतः समजत नाही. त्यामुळे त्या विषयाची गोडी वाटत नाही. या अभ्यासग्रंथात अशोकापूर्वीपासूनच्या ज्ञात इतिहासाची उपलब्ध माहिती संकलित करून संक्षिप्तपणे वाचकांच्या हाती देण्याचा प्रयत्न केला आहे. 'प्राचीन भारताचा संक्षिप्त इतिहास व प्रियदर्शी 'अशोक' हा एक अभ्यासग्रंथ आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाशी व सम्राट अशोकाच्या चरित्र-लेखनाशी निगडीत अशी अनेक भारतीय व अभारतीय अभ्यासू व विचारवंत लेखकांनी लिहून ठेवलेली तसेच संगणकावरही उपलब्ध असलेली विविध विषयांची, विविध ठिकाणी विखुरलेली अत्यंत उपयुक्त अशी ही माहिती एकत्रित करून ससंदर्भ वाचकांच्या हाती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या अभ्यासग्रंथातून केला आहे.