Summary of the Book
वास्तुकलेचे क्षेत्र विस्तीर्ण आहे. त्यामध्ये अनुभव विश्व, स्मृती, सौंदर्य दृष्टी , साहित्य,आणि प्रयोग कला यांचा समावेश होतो. वास्तुकालेकडे तंत्राद्यान, धंदा , उपयुक्तता, आणि चटई- क्षेत्र अशा मर्यादित दृष्टीने न बघता त्यापलीकडे जाऊन बघितले तर वास्तुकलेचा आवाका समजू शकतो तसेच तिचा आस्वाद घेणे शक्य होते. 'झरोका' मधील लेख अनुभव, संवेदना, सौंदर्य- चकित्सा , आणि संवर्धन अशा विविध दृष्टीकोनातून वास्तुकलेला न्याहाळायचा प्रयत्न करतात. हे पुस्तक वास्तुकलेचे आपल्या जाणिवेशी असलेले नाते उलगडायचा प्रयत्न करते. दारे, खिडक्या, छप्पर, आंतरांगण, झरोका, जिने, इत्यादी वास्तुघटकांचे सौंदर्य निकष कसे ओळखावे हे तपासते. वास्तुकलेच्या पर्यावरणीय, लोकमान्य, धर्मानिगडीत, गरजू, विकाऊ, व कला, अशा सहा कोटी विषद करून त्यामधील काही ठळक उदाहरणांची चर्चा छायाचित्रे , रेखाटने, नमुने, यांची जोड देऊन केली आहे.