Summary of the Book
शहराचा इतिहास सांगणारी पुस्तके आता येऊ लागली आहेत. डॉ. सु. र. देशपांडे यांनी वाईवर लिहिलेले हे पुस्तक वाईच्या सांस्कृतिक संचिताची ओळख करून देते. वाईतील अनेक शतकांपासूनची मंदिरे, वाडे, तिथली चित्रे या सार्याबद्दल सविस्तर माहिती इथे आहे. वाईची परंपरा, या शहरातील उपक्रम या सगळ्यांचा चांगला वेध घेतला आहे. उत्कृष्ट कागद आणि उत्तम छपाई यामुळे पुस्तक अत्यंत देखणे झाले आहे.