Hard Copy Price:
25% OFF R 480R 360
/ $
4.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
श्री. अभिजीत वाघमारे ' शौर्यशृंग ' ही शशी भागवत आणि नाथमाधवांच्या परंपरेतील एक अद्भुतरम्य आणि रहस्यमय कादंबरी आहे. तुम्ही वरील निर्देशित चित्रावर क्लिक केले तर प्रस्तावना आणि सुरवातीची चारपाच पाने वाचायला मिळतील. मनावर ठसणारी पात्रे, संस्कृत प्रधान भाषाशैली, अगदी शेवटच्या पानापर्यंत कुतूहल टिकून राहते, ही या कादंबरीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
Abhijit Waghmare
05 Jul 2023 05 30 AM
मला कोणी सांगू शकेल का की, हे पुस्तक कोणत्या विषया संबधित आहे ते
Ajinkya Limaye
17/03/2023
रोमहर्षक, चित्तथरारक, गूढ आणि विस्मयकारक. वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक! नाथमाधव आणि शशी भागवतांच्या पठडी मध्ये मोडणारे हे पुस्तक म्हणजे या प्रकारच्या नवलकथांच्या सध्या असलेल्या दुष्काळात पडणाऱ्या पावसासारखे ताजेपणा आणणारे आहे.
पुस्तक वाचायला घेतले की खिळवून ठेवते. लेखकाने तयार केलेली भूगोल आणि काळाची चपखल मांडणी या कथानकाला आकर्षक गतीने मांडत जाते. वाचताना डोळ्यापुढे एक प्रचंड आणि जादुई काळ उभारल्याशिवाय राहात नाही. भाषासौंदर्य , खिळवून ठेवणारे कथानक आणि मनाला भिडणारी पात्रे म्हणजे अभिषेक साळुंख्यांनी लिहिलेले शौर्यशृंग! सध्याच्या काळात दर्जेदार मराठी साहित्याची निर्मिती केल्याबद्दल लेखकाचे मनापासून आभार आणि अभिनंदन!! वाचकमित्रहो नक्की वाचावे असे पुस्तक!!
Suraj shinde
17/03/2023
मी ह्या पुस्तकाला ५ स्टार देईन कारण आजकाल असल्या कादंबऱ्या वाचकांना मिळत नाहीत ,ह्या पुस्तकात आपल्याला सर्वच ९ रसांचे अस्तित्व जाणवते .मध्ययुगीन कालखंड इतका जोरकसपणे लेखकाने हयात मांडला आहे की अवघा काळ आणि सर्वच पात्रे आपल्या डोळ्यासमोर तरळत राहतात.ह्या पुस्तकाचे वैशिट्य म्हणजे हयात वापरलेली भाषा प्रथमदर्शनी कठीण वाटते परंतु नंतर नंतर आपण त्याशी समरस होऊ लागतो .पुस्तक मोठे आहे पण वेग उत्तम आहे हातात घेतल्यावर कधी एकदा मी पुढे सरकतो आहे असे वाटू लागले. हयात वळणावळणावर रहस्य आहेत जी आपल्याला कथेत गुंतवून ठेवतात. शेवट हा देखील उत्तम आहे परंतु मला असे वाटते की लेखकाने पुढच्या भागावर काम करावे किंवा त्याचा मनसुबा असेल सुद्धा पण सर्वच धाटणीच्या वाचकांनी एकदा हे पुस्तक वाचावे हे नक्की