Summary of the Book
महाकवी कालिदासाचं अमर महाकाव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रघुवंश’चा हा रसास्वाद. त्यातल्या वेगवेगळ्या उपमांचा अर्थ आणि सौंदर्य उलगडून दाखवणारं हे पुस्तक विद्याकर भिडे यांनी लिहिलं आहे. संस्कृत न कळणाऱ्यांनाही रघुवंशाचा साहित्यिक आस्वाद घेता यावा, या हेतूनं त्यांनी हे संशोधनपर पुस्तक लिहिलं आहे.
सूर्य, चंद्र, मेघ, समुद्र, नदी, पर्वत, पशु, हत्ती, वृक्ष, पुष्प, स्त्री अशा अनेक विषयांवर रघुवंशात आलेल्या उपमा, त्यांचे संदर्भ आणि अनुषंगिक गोष्टी भिडे यांनी उलगडून दाखवल्या आहेत. संस्कृतच्या आणि अभिजात कवितांच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.