atul nandgaokar
15/05/2013
सर्वप्रथम ह्या पुस्तकाचे लेखक श्री संजय शिंदे यांचे अभिनंदन.एकन्दर लेखनिवरून असे लक्षात येते कि लेखक हे नवीन आहेत. आणि कदाचित हे त्यांचे पहिले पुस्तक असावे.शुद्ध लेखनाच्या खुपस्या चुका असल्या तरी देखील विषय व्यवस्तीत मांडल्यामुळे पटकन समजला.
शेअर बाजारातील सहभागी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा अंदाज आलेखा द्वारे लावून लांब अवधीच्या गुंतवणुकीसाठी शेअर्स निवडण्यासाठी ह्या पुस्तकात चर्चा केलेली पद्धत ही अचुक आहे हे पुराव्यांसहीत पटवून देण्याचा लेखकाने प्रय्तन केला आहे.
पुस्तकातील शेवटचा भाग समृद्धीच्या पाऊलखुणा १ ० शेअर्स हा भाग पुस्तकातील विचार हे काल्पनीक नसून ते व्यवहारीक आहेत हे सिद्ध करण्यासाठी जोखिम घेउन केलेला प्रयोग. अस्या प्रकारचा प्रयोग प्रथमच पुस्तकातून अनुभवायला भेटतो. एकंदर हे पुस्तक वाचताना शेअर बाजाराचा कोर्स करत आहे असे वाटले. इतर शेअर बाजारावरील वाचलेल्या पुस्तकान पेक्षा हे पुस्तक वेगळे आहे हयाची जाणीव पुस्तकं वाचतांना झाली.नक्कीच इच्छुकांना मार्गदर्शक ठरेल असे पुस्तकं.