परदेशात सहल म्हटली, की अमेरिका, युरोप यांना पहिली पसंती मिळते. तेथील पर्यटन आता भारतीयांना नवे राहिलेले नाही. अशी रुळलेली पर्यटनस्थळे टाळून कंबोडिया, व्हिएतनाम, जॉर्डन, इस्राइल, ग्रीस, बल्गेरिया अशी आगळ्या देशांची सफर करून पुष्पा जोशी यांनी तेथील प्रवासवर्णन ‘कंबोडिया ते कॅनडा’मधून केले आहे.
कंबोडिया व प्राचीन भारतीय संस्कृती, शिल्पकला यांच्यातील साम्य, अंगकोरवाटमधील मंदिर, तेथील कृषिजीवन, आध्यात्मिक वारसा यांची माहिती वाचायला मिळते. अमेरिका, फ्रान्स यांसारख्या बलाढ्य देशांना गनिमीकाव्याने झुंजविणारा छोटासा; पण महान देश व्हिएतनाम, आनंदी माणसांचा व निसर्गसंपन्न देश भूतान, लालसर पांढऱ्या वाळूतील जॉर्डन, इस्लामी राष्ट्रांच्या गराड्यातील; पण स्वकर्तृत्वाने प्रगतीपथावर चालणारा इस्राइल, प्राचीन संस्कृती शिकवणारा ग्रीस, तसेच टांझानिया, मोरोक्को, केनिया, पोर्तुगाल, स्पेन या वेगळ्या देशांचे अनुभवही यात सांगितले आहेत; तसेच रशियाची राजधानी मॉस्कोची सफरही यातून करता येते व पीटर्सबर्गचे ऐश्वर्यही लेखनातून डोळ्यांसमोर उभे राहते.
‘कंबोडिया ते कॅनडा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5310316751850119691