वेगळाच केरळ
Bhatkanti
Bhramanti
Information
Informative
Keral
Mahitipar
Nisarga
Pravas Varnan
Pravasvarnan
Suvarna Gokhale
Traveling
Vegalach Keral
Veglach Keral
केरळ
किल्ले
निसर्ग
प्रवास वर्णन
प्रवासवर्णन
भटकंती
भ्रमंती
माहितीपर
वेगळाच केरळ
सुवर्णा गोखले
Hard Copy Price:
R 0
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
eBook Price:
R
50
/
$
1.00
Buy eBook
Add to Cart
सुनीत नित्सुर.
25 Mar 2025 12 08 PM
पर्यटन विषयक एखादे पुस्तक विकत घेणे आणि ते वाचणे म्हणजे पैशांची आणि आपल्या वेळेची विनाकारण केलेली उधळपट्टी असाच सर्वसाधारण गैरसमज असतो. आणि त्याला कारणही तसेच आहे. मुळातच रुक्ष असणारा भूगोल हा विषय शैक्षणिक अभ्यासक्रमात नीरस स्वरूपात पुस्तकाद्वारे सादर केलेला असतो आणि तितक्याच बेचव पद्धतीने शिकवला गेलेला असतो. त्याचा परिणाम म्हणजे भूगोल या विषयाबद्दल आपल्या मनात एक कायमस्वरूपी अढी निर्माण झालेली असते.
एक फोटो हा हजारो वर्णनात्मक शब्दांपेक्षा जास्त माहिती देतो असे पूर्वापार चालत आलेले एक प्रचलित आहे आणि ते यथार्थच आहे. पण असेच काही फोटो आणि त्यांच्या जोडीने फोटोंचे चपलाख वर्णन करणारे शब्द जर एकत्र आले तर त्याचाच दुग्ध शर्करा योग बनतो आणि ह्याची प्रचिती येते ती, सौ. सुवर्णा गोखले यांनी त्यांच्या केरळ पर्यटना निमित्त लिहिलेले छोटेसे पुस्तक वाचताना. मुखपृष्ठ पाहून कुतूहल जागृत झाले आणि ई बुक वरून ते पुस्तक मागवून वाचायला सुरुवात केली.
एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जेव्हा आपण सहकुटुंब सहपरिवार पर्यटनाला म्हणून जातो, तेव्हा आपला उद्देश, फक्त आणि फक्त, आपल्याला मिळालेले चार दिवस शांतपणे उपभोगायचे आणि पुढील वाटचालीसाठी नवीन जोश, उत्साह, उमेद वगैरे घेऊन परत यायचे असाच असतो. ह्या रूढ संकल्पनेला छेद देणारे हे पुस्तक आहे.
वाचनाची पहिली फेरी अर्ध्या पाऊण तासातच संपली. आणि आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. हे पर्यटन विषयक पुस्तक म्हणजे नुसते हौसमौजेचे वर्णन न रहाता, आपण जातो त्या भागातील संस्कृती, तेथील स्थानिक लोकांचे रहाणीमान, वगैरेंची सर्वंकष माहिती देणारा एक छोटासा धडाच बनतो. अशा पद्धतीचे अनेक धडे जर एकत्रितरित्या शालेय अभ्यासक्रमात सहभागी केले, तर भूगोल हा कंटाळवाणा विषयसुद्धा आवडीचा विषय बनायला वेळ लागणार नाही.
प्रत्येकाने आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे. आणि लेखिकेने केलेली, वेगवेगळ्या प्रांतांची प्रवासवर्णने लवकरात लवकर प्रकाशित करावी अशी त्यांना नम्र विनंती सुद्धा आहे.