Summary of the Book
"नाटकं ठेवणीतली" हे पुस्तक म्हणजे मराठी रंगभूमीच्या जन्मापासूनच्या, शतकभराच्या कालावधीतील सशक्त आणि महत्वाच्या नाटकांचा एक खजिनाच आहे.
इ. स. १८५५ च्या महात्मा ज्योतीराव फुले, ह्यांच्या 'तृतीय नेत्र' ह्या नाटकापासून १९५० पर्यंतच्या मामा वरेरकरांच्या 'भूमिकन्या सीता' ह्या नाटकापर्यंतच्या लक्षणीय नाट्यकृतींचा परिचय ह्या पुस्तकात करून देण्यात आला आहे..
प्रत्येक नाटकाचे थोडक्यात कथानक तर दिलेले आहेच, परंतु त्याचबरोबर लेखकाने त्या नाटकातील सौंदर्यस्थळांचा आणि वर्तमानकाळातील, त्या नाटकाशी असलेल्या संबंधांचाही उल्लेख केला आहे. प्रत्येक नाटकाचे पहिल्या प्रयोगाचे दुर्मिळ छायाचित्र आणि नाटककाराचेही छायाचित्र देण्यात आले आहे...
अभ्यासकांना संदर्भ ग्रंथासारखा ह्या पुस्तकाचा उपयोग होईलच पण सर्वसामान्य रसिकांनाही गुंतवून ठेवेल.
शतकभराच्या कालावधीत रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य विषय, भाषा आणि स्वभावचित्रण ह्यात जे फरक पडत गेले, त्याचा एक आलेखच हे पुस्तक काढते..
एकूण ८४ नाटकांची, १२५ आडव्या पृष्ठात ओळख करून देणारे हे छोटेखानी पुस्तक म्हणजे दृष्टीक्षेपात शतकोत्सवी रंगभूमीचे दर्शन आहे.