Hard Copy Price:
15% OFF R 300R 255
/ $
3.27
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
आदिमानवाच्या पाऊलखुणा असलेल्या कातळशिल्पांसंबंधी सविस्तर माहिती देणारे, कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांचे 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हे पुस्तक या विषयावरील पहिलेच पुस्तक आहे. आकर्षक बहुरंगी छपाई असलेले आणि शंभरहुन अधिक छायाचित्रे असलेले हे पुस्तक जिज्ञासु वाचकांना मेजवानी ठरेल. पुस्तकाचे लेखक सतीश लळीत म्हणतात की, ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हे पुस्तक या विषयावर सांगोपांग माहिती देणारे पहिलेच पुस्तक आहे. कातळसड्यांवर आदिमानवाने अश्मयुगात खोदून ठेवलेली कातळशिल्पे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानवनिर्मित सर्वात प्राचीन गोष्ट आहे. सन 2001च्या मे महिन्यात मालवण तालुक्यातील हिवाळे येथील कातळशिल्पांच्या शोधाच्या माध्यमातून आपला हा प्राचीन वारसा सर्वांसमोर आणण्यात मी यशस्वी ठरलो. तेव्हापासुन ते ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’या पुस्तकापर्यंतचा प्रवास या पुस्तकात शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. संपुर्ण बहुरंगी छपाई असलेल्या या पुस्तकासाठी गुळगुळीत आर्ट पेपर वापरुन त्याचे निर्मितीमुल्य उत्कृष्ट ठेवण्यात आले आहे. या पुस्तकात सात प्रकरणे असुन १० परिशिष्टांचा समावेश आहे.