Summary of the Book
आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या हणमंत क्षिरसागर यांच्या दाहक अनुभवाची पार्श्वभूमी लाभलेल्या 24 कथांचा हा संग्रह. या सगळ्या लघुकथाच आहेत पण वाचणाऱ्याला अस्वस्थ करण्याची ताकद त्यामध्ये आहे. जात आणि गरिबी यामध्ये होरपळून गेलेल्या माणसांच्या या कथा आहेत. काही कथा अंधश्रद्धा कसे हाल करते ते सांगणाऱ्या आहेत. पुस्तकाच्या शिर्षकावरून कथांची कल्पना येते. तळागाळातील माणसाचा जीवन जगण्यासाठीचा संघर्ष आणि निष्ठूर समाजव्यवस्थेचे चित्र यात आहे.