Summary of the Book
षांताराम पवार यांचं व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी आहे, त्यांचे विद्यार्थीही विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने स्थिरावले आहेत. चित्रकार, कवी, कलाशिक्षक म्हणून पवारांचा पडलेला प्रभाव दूरगामी आहे. गुरूजनांबद्दलचा आदर प्रत्येकालाच असतो. पण पवारांसारखे गुरू विद्यार्थ्यांच्या उत्तरायुष्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या वाढत्या कलाजाणिवेबरोबरच आपलाही कलानुभव नित्यनूतन ठेवतात. एका वेगळ्या पातळीवरचा संवाद आजही त्यांच्या काही प्रथितयश विद्यार्थ्यांबरोबर चालू असतो.
अशाच काही विद्यार्थ्यांचे पवार सरांवरील व्यक्तिदर्शनपर लेख, जोडीला स्वत: शांताराम पवारांचे लेख आणि पवारांचा काळ जिवंत करणारे प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांचे चरित्रकथन यातून हे पुस्तक आकाराला आले. दीपस्तंभ हा मार्गदर्शक असतो. त्याचं आकलन आपल्या वाढत्या वयानुसार बदलत असतं. अशाच एका कलाक्षेत्रातल्या दीपस्तंभाची ही कहाणी ...