Hard Copy Price:
25% OFF R 325R 244
/ $
3.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
सुरूवातीला वाटलं होतं की, बैलगाडा शर्यत विषयी काय वाचायचे या पुस्तकात. पण, जेव्हा पुस्तक वाचायला घेतले, तेव्हा असं वाटलं की यार हे सगळं आपल्या आजूबाजूला घडतं आहे, आपलीच कथा आहे. कादंबरीतील सगळी पात्रे जणू आपल्या जवळची आहेत. खरी आहेत. आपली वाटतात. कादंबरीमध्ये लेखकाने जी फ्लॅशबॅक प्रेमकथा पेरली आहे, अतिशय सुंदर आणि काळजाला भिडणारी आहे. कादंबरी वाचताना आपण नायकसोबत ऐतिहासिक स्थळांची सैरही करतो. नवीन माहितीही मिळते. हिंदकेसरी बैलांचा थरारक ऐतिहासिक प्रसंगही जबरदस्त झाले आहेत. आवर्जू वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी कादंबरी.
Rahul Mane
06 Feb 2025 05 30 AM
आजवर वाचण्यात आलेली बैलगाडा शर्यत विषयावरची पहिली आणि जबरदस्त कादंबरी... बैलगाडा शर्यतीचा इतिहास, बंदी आणि बैलगाडा शर्यत क्षेत्राविषयी इत्यंभूत माहिती आणि थरारक कादंबरी...
Shital Kudale
31/05/2025
आवर्जून वाचावी अशी कादंबरी...
लेखक ईश्वर आगम यांचं लेखन मी प्रतिलिपी आणि मातृभारती वर वाचले आहे. अतिशय सुंदर आणि खिळवून ठेवणारे त्यांचे लेखन आहे. पुस्तक रूपाने आलेली ही त्यांची पहिली कादंबरी. पण तुम्हाला कुठेही असे वाटणार नाही की, लेखक नवखा आहे. त्यांच्या लेखनामध्ये निश्चितच प्रगल्भता आहे. त्यांनी निवडलेला विषयही अतिशय वेगळा आणि आजवर कुणीही त्यावर लिहिलेलं नाहीये. त्यांनी हे धाडस केलं आणि त्यात ते पुरेपूर यशस्वी झाले आहेत. कादंबरी वाचताना बैलगाडा शर्यतींचा थरार, ती उत्कंठा, ते वातावरण अक्षरशः आपण अनुभवत आहोत, पाहत आहोत असे वाटत राहते. खूप सुंदर ग्रामीण बाज असलेली आणि वास्तव लेखन असलेली ही कादंबरी म्हणजे एक अनमोल ठेवा आहे. सर्व मराठी वाचकांनी एकदा आवर्जून वाचावी आणि आपल्या संग्रही ठेवावी अशी कादंबरी.